अवांतर
घरची लक्ष्मी खरंच लक्ष्मीसारखी येरझाऱ्या घालत हवेतले संदेश हवेतच न सोडता बरोबर हातातल्या यंत्रात प्रकट वाचत होती. फुदकत (खिदळत नाही) होती.
आणि स्वयंपाक गृहात काम करणारे नवरोबा या सतत आत - बाहेर करणाऱ्या लक्ष्मीला. "मार्केट चे जाऊदे तू तरी बस एका ठिकाणी... असे लोक डॉन म्हणून फिरले की शांत असणारे कोरोदेवाला म्हणतात, मी नाही.....ते " असे नाकावरच्या माशीला ... मनात म्हंटले.
बायकोच्या वाचनात कोणासा जुना इनोद आला. त्यावरून तिला खेळ ( सागरगोटे ... चीचुके नाही) खेळण्याची कल्पनेची आयडिया सुचते. मग नवऱ्याला "अहो ऐकलं का, आपण एक नाटक खेळू "
नवरा : असं, हे तरी पूर्ण होउदे... मग
बायको : कळतात हो... टोमणे... आता ऐकाल का,,(लाडात येत) अहो आपण रामायण-रामायण खेळू ; तुम्ही व्हा रावण मी होते सीता.
तो : अगं 'राम' म्हणायचेय का तुला .
ती : नाही हो, तुम्ही ना सस्पेन्सच घालवता( बिघडवता) जळलं लक्षण ते .. सांगत्ये ते करा.
तो : बर् ! (मनात) महाभारत तरी करायचं
ती : तुम्ही ना माझे प्रियकर ..... रावण बनून यायचे.
तो : हं ( कुठे तरी अजब विश्वात हरवल्यासारखा चेहरा करत मनात :' अगं नवरा बनलोयच आगोदर त्यात कमीत कमी रावण तरी ठीक ,,प्रियकर... ( वाकडे तोंड .. सरळ करत ) तिच्यासाठी रावण म्हणजे तिच्या प्रियकरापासून दूर नेणारा. जसं काय ... arrange मध्ये हिच्या बापाचे पाय पकडले होते.)
ती : मग ना तुम्ही भिक्षा मागणार ...
तो : बर् ( भिकारी तर झालेलोच आहे, या रोल मध्ये अजिबात कमी नाही; मजबूत मागणार ... फाळके च मिळाले पाहिजे ( Made In India )
ती : मग मी सीता ... लाजत लाजत येते
तो : अच्छा लाजत ... ( त्यात काय लाजायचं भीक घालताना काहीही )
ती : मग मी आश्वस्थ करून भिक्षा आणते.
तो : (आ…. सं.... व.. स .... थ .... आपलं काय नाय तरी .. हिचं मराठी सुधारली .. आता मला सुधारावं लागल ... change म्हणून थोडं काही ... )
ती : मग तुम्ही भिक्षा घेण्यासाठी पुढे आला तरी चालेल. लक्ष्मण रेषेची काय गरज नाही. त्या पार्ट ची गरज नाही
तो : पार्ट .. अक्खा ( त्याच्यातला नवरा जागा झाला ) तसं कसं ... ती पाहिजेच त्याशिवाय समाजात स ,, सॅन कृत प ...ना...
ती : अहो, ससंस्कृतपणा म्हणायचे का तुम्हाला.
तो : हो... तेच ते.. तर ती पाहिजे ...
ती : काय
तो : रेषा ... लक्ष्मण रेषा
ती : ठीक आहे असू द्या तो पार्ट मेल्यानो, नाटकात सुद्धा सुखाने जगू देत नाय हा माणूस... इथून तिथे चालवणार मला .... त्याशिवाय राहील का !
तो : राहू दे का मग तो पारटं !
ती : आता बोलले ना, मग असू द्या. मला काय धाड भरलीये, चार पावलं चालायला. (जळलं ... मेलं ते. लक्षण .. कोणीकडून अवदसा सुचली .. अन ह्यांच्याशी लगीन केलं जणू.. )
तो : ठीक आहे, पुढे !
ती : हं, तर ( लाजत) मी की नयी ..... मी की नयी ....
तो : ( घेकसून) बोल ना ! ( आता त्यात काय लाजयचं भीक दे आणि जा आतमध्ये. )
ती : तुम्ही जरा चुपता का ! रोमँटिकपणाच नाही तुमच्यात. मी बोलते ते नीट्ट ऐका.
तो : बरं
ती : मी जशी तुम्हाला भिक्षा देईल तसं तुम्ही मला उचलणार आणि पळीवनार.
तो : आं ( च्यायला काय change च नाय राव. इथं पण हिला उचलायची. अगं वाढलीस तू असं कसं म्हणणार.... ) अगं त्रास होईल, चालत जाऊ आपण.
ती : काय त्रास होत नाय मला, लागले शिकवायला, सर्व नाटके कळतात मला, चला सुरु करू नाटक ..
सर्व नाटक पूर्ण होत आलं.... शेवटी कसे बसे ह्याने उचलले .. तशी बायको डॉयलॉग बोल-ली " पळीव -पळीव मला ... नायतर लय दिवस लाईन मारत होते.. "
तो : (त्याचीच फळे आहेत आयला नाटक म्हणजे नाटक ) अगं , कुठं न्यायचे ?...
ती : अहो, न्या दरवाज्यापर्यंत तिथं सोन्याची लंका आहे ती पळवून आणू आपण .
तो : अगं .... ( आयला joke सुरु झालाय की संपलाय .. काय कळना झालंय )
No comments:
Post a Comment